म्युन्सिपल पार्क परिसरातून कारची चोरी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील म्युन्सिपल पार्क परिसरातून कारची चोरी झाल्याची घटना बुधवारी १० जुलै रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील म्युन्सिपल पार्क येथे प्रविण देविदास भोळे वय ५९ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून ते आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरासमोर त्यांनी त्यांची कार क्रमांक (एमएच १९ क्यू ९२७२) ही घरसमोर पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने ही कार चोरून नेली. ही घटना बुधवारी १० जुलै रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आली. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर सायंकाळी ५ वाजता त्यांनी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद नेवे हे करीत आहे.

Protected Content