स्विच गियर कंपनीत चोरी; ३६ हजारांचा मुद्देमाल लांबविला


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसी मधील जी-सेक्टरमधील चंदन स्विच गियर कंपनीतून तांब्याच्या पट्ट्या, कॉम्प्यूटर आणि वायफाय राऊटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २७ ऑक्टोबर रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंदन भगवान रंगलानी वय ४२ रा. मनिषा कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे एमआयडीसीतील जी सेक्टरमध्ये चंदन स्वीचगीयर कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी तांब्याच्या पट्ट्या, कॉप्यूटर आणि वायफाय राऊटर असा एकुण ३६ हजार २६० रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चंदन रंगलानी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी १ नोव्हेबर रोजी दुपारी अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे हे करीत आहे.