जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा येथील बसस्थानक येथील नाश्त्याच्या दुकानावरून एकाचा ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, संदीप भगवान साळुंखे वय-३५, रा.पिलखेडा ता.जि.जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तवाला आहे. दरम्यान ते जळगाव तालुक्यातील कानळदा येथील बसस्थानकावरील नाश्त्याच्या दुकानावर थांबले. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला, ही बाब त्यांच्या लक्षात आले. दरम्यान त्यांनी परिसरात मोबाईलच्या सर्वत्र शोध घेतला, परंतु मोबाईल बाबत कोणतेही माहिती मिळाली नाही. अखेर रविवारी १४ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण इंगळे हे करीत आहे.