कर्नाटकमधील हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट ; एक गंभीर जखमी

hubali blast 1

बेळगाव वृत्तसंस्था । कर्नाटकमधील हुबळी रेल्वे स्थानकात स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटाती तीव्रता इतकी भीषण होती की, रेल्वे स्टेशनवर ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या परिसराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हुबळी रेल्वे स्थानक एक मोठे जंक्शन आहे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे झोनचे मुख्यालय सुद्धा आहे. रेल्वे स्थानकात स्फोट झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आरपीएफ, पोलिसांची टीम आणि बॉम्ब शोधक पथक दाखल झाले आहेत. घटनेनंतर संपूर्ण रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले. रेल्वे स्थानकाच्या परिसरात तपासणी सुरु करण्यात आली आहे.

हुबळी रेल्वे स्थानकावर काल (सोमवारी) झालेल्या स्फोटात हुसेनसाब नईवाले हा तरुण गंभीर जखमी झाला. स्टेशनवर आलेल्या एका पार्सलमधील संशयित वस्तूच्या माध्यमातून हा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज समोर येत आहे. स्फोटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. पोलिसांच्या शोध मोहिमेत आणखी आठ स्फोटक वस्तू आढळून आल्या आहेत. विजयवाडा वास्को मार्गावर धावणाऱ्या अमरावती एक्स्प्रेसमध्ये रिकाम्या डब्यात रेल्वे स्थानकावरील चहा विक्रेता हुसेनसाब याला एक पार्सल आढळून आलं. त्याने ते पार्सल स्टेशन मास्टर केबिनमध्ये नेलं. पार्सलमध्ये लिंबूसदृश वस्तू होत्या. रेल्वे सुरक्षा रक्षकांनी पार्सल घडण्याची सूचना हुसेनसाबला दिली. मात्र पार्सल उघडताच त्याचा स्फोट झाला. स्फोटात हुसेनसाबच्या हाताला जखम झाली तर केबिनच्या काचांचा चक्काचूर झाला. काचेचे तुकडे स्थानकावर पसरले. स्फोटाची तीव्रता कमी असल्यामुळे मोठा अनर्थ टळला. जखमी हुसेनसाबला तातडीने किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

रेल्वे स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वेची तपासणी करण्यात येत असून पुढील तपासासाठी पोलिसांकडून रेल्वे स्थानकातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेण्यात येत आहे.

Protected Content