बँकांमध्ये लवकरच होणार पाच दिवसांचा आठवडा ?

Banks ke1D 621x414@LiveMint

 

नवी दिल्ली प्रतिनिधी । बँकांमधील कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. लवकरच बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा सुरू होणार असून आठवड्यातील पाच दिवसच कर्मचा-यांना काम करावं लागणार आहे. दर शनिवार आणि रविवारी बँका बंद असतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या दर रविवार आणि दुसरा-चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.

सूत्रांच्या माहितीनुसार, अर्थ मंत्रालयानं बँक कर्मचाऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करण्याचे मान्य केले आहे. महिनाभरात बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात आमच्याशी चर्चा करून हे प्रश्न मार्गी लावावेत, असे निर्देशही मंत्रालयाने इंडियन बँक्स असोसिएशनला (आयबीए) दिले आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बँक संघटनांसमवेत आयबीएची एक बैठक होणार आहे. लवकरच बैठकीची तारीख घोषित करण्यात येईल. या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर नोव्हेंबरच्या अखेरीपर्यंत पाच दिवसांचा आठवडा आणि फॅमिली पेन्शन, वेतनवाढ आदींबाबतची घोषणा करण्यात येईल.

Protected Content