छगन भुजबळ यांचा पराभव निश्‍चीत : संजय राऊत

पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येवला विधानसभा मतदारसंघातून पुढील निवडणुकीत छगन भुजबळ यांचा पराभव निश्‍चीत असल्याचे सांगत खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे.

 

संजय राऊत पंढरपूरच्या दौर्‍यावर असून  यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. येवल्यात आम्ही छगन भुजबळांचा पराभव करणार. मी पांडुरंगाच्या दारात सांगतो. येवल्याचा पुढचा आमदार हा शिवसेनेचा असेल. भुजबळ विधानसभेत नसतील. आम्ही मुंबईत त्यांचा पराभव घडवून दाखवला आहे. नाशिकला लोकसभेत त्यांचा पराभव केला आहे. आता येवल्यात करू, असे संजय राऊत म्हणाले.

 

दर दुसरीकडे राष्ट्रवादीतील फुटीनंतर आज शरद पवार यांची पहिली जाहीर सभा नाशिकमध्ये होणार आहे. छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातच पवार यांची सभा होणार आहे. ते नाशिकहून येवला येथे जाण्यासाठी निघाले असून रस्त्यात ठिकठिकाणी पवार यांचे अतिशय जल्लोषात स्वागत होत आहे.

Protected Content