आयएनएक्स प्रकरण : चिदंबरम यांना जामीन मिळूनही कोठडी !

P Chidambaram

मुंबई प्रतिनिधी । आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, तरीही चिदंबरम यांना २४ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत राहावं लागणार आहे.

आयएनएक्स मीडिया प्रकरणात अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन दिल्ली उच्च न्यायालयाबरोबरच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. अटक झाल्यापासून पी. चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांना सर्वोच्च न्यायालयात दिलासा मिळाला आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिला आहे. ‘पी. चिदंबरम यांना इतर कोणत्याही प्रकरणात अटक झालेली नसेल तर त्यांना जामीन दिला जाऊ शकतो. मात्र, त्यासाठी त्यांना १ लाख रूपयांचा बॉण्डपेपर आणि चौकशीला बोलवण्यात आल्यानंतर हजर राहावं लागेल’, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Protected Content