Home Cities जळगाव तरूणाचा मोबाईल हिसकावून दोघे दुचाकीवरून पसार; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

तरूणाचा मोबाईल हिसकावून दोघे दुचाकीवरून पसार; शहर पोलीस ठाण्यात गुन्हा

0
153


जळगाव प्रतिनिधी । शहरातील नुतन मराठा महाविद्यालय परिसरातील रोझ गार्डन येथून एकाचा ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पळ काढल्याची घटना घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, दिपक वाल्मिक मोरे (वय-२७) रा. गोंडगाव ता. भडगाव हा तरूणी शहरातील भक्ती हॉस्पिटलमध्ये वार्ड बॉय म्हणून नोकरीला आहे. २० जून रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दिपक हा नुतन मराठा महाविद्यालय परिसरात असलेले रोझ गार्डनमध्ये बसलेला असतांना दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवर आले. त्यातील एकाने दिपकच्या हातातील ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढला. आराडाओरड केली परंतू तोपर्यंत दोघेजण दुचाकी घेवून पसार झाले होत. शहर पोलीस ठाण्यात दिपक मोरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील करीत आहे. 

 


Protected Content

Play sound