चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील खरजई शिवारातील गट क्रमांक १४५ मधील शेतकऱ्याच्या शेतातून ८ लाख ५० हजार रूपये किंमतीचे ट्रॅक्टर आणि कॉप्रेसर चोरून नेणाऱ्या चोरट्याला मुद्देमालासह मध्यप्रदेशातून चाळीसगाव शहर पोलीसांनी रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता अटक केली आहे. अशी माहिती जिल्हा मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
गणेश गोविंदराव झेंड वय २५ रा. टाकळी ता. चाळीसगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती व ट्रॅक्टरचालक म्हणून काम करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ बीजी ८०४१) क्रमांकाचे न्यू हॉलंड कंपनीचे ट्रॅक्टर आहे. शुक्रवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांनी त्यांचे ट्रॅक्टर खरजई शिवारातील बद्रीनाथ शेटे यांच्या शेतात ट्रॅक्टर आणि कॉप्रसेर पार्कींगला लावले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ८ लाख ५० हजार रूपये किंमतीचे ट्रॅक्टर आणि कॉप्रेसर चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच चाळीसगाव शहर पोलीसांनी संशयित आरोपी प्रेमसिंग देवराम पावरा रा. मध्यप्रदेश याला मध्यप्रदेशातून अटक केली आहे.त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्ष डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्ष कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधिक्ष अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ प्रशांत पाटील, आशुतोष सोनवणे आणि रविंद्र बच्छे यांनी केली आहे.