किर्तन सुरू असतांना तरूणांचा गोंधळ; एका तरूणाला बेदम मारहाण

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरुण परिसरातील महादेव मंदिराजवळ महाशिवरात्रीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता किर्तन सुरू असताना काही तरुणांनी गोंधळ घातला आणि शिवीगाळ केली. तरुणांना शिवीगाळ करू नका असे म्हटल्याचा राग आल्याने सुमारे वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने बिजासन फकिरा घुगे (वय २९, रा. महादेव मंदिराजवळ मेहरुण) या तरुणाला मारहाण केली. या घटनेत बिजासन गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

महाशिवरात्रीनिमित्त मेहरुण परिसरातील महादेव मंदिराजवळ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी रात्री ९ वाजता किर्तन सुरू असताना काही तरुण तिथे क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळताना तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच, ते शिवीगाळ करत होते. काही लोकांनी तरुणांना शिवीगाळ करू नका असे सांगितले. त्यामुळे तरुणांच्या टोळक्याने बिजासन घुगे यांना लाथा-बुक्क्या व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत बिजासन गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. अचानक झालेल्या वादामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content