शेजारच्या राज्यातुन छुप्या मार्गाने आयातित प्रतिबंधीत पानमसाला गुटख्याची तालुक्यात सर्वत्र विक्री

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | यावल येथील पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सर्वत्र न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या व शेजारच्या दोन राज्यातून तस्करीतुन आयात करून विक्रीस येणाऱ्या मौखिक आरोग्यास गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण करणारा विमल पानमसाला गुटख्याची सर्रासपणे यावल शहरातील बसस्थानक परिसर, शाळा, विद्यालय अशा सार्वजनिक ठिकाणी परिसरातील पान टपऱ्यापासुन तर किराणा दुकानातुन लाखो रुपयांच्या पानमसाला गुटख्याची विक्री करण्यात येत आहे. नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत या विषयाकडे संबधीत अन्न व औषद्य प्रशासन विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याचे चर्चा अनेक पालक व सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे. या गुटखा विक्रीवर कारवाई कोण व कधी करणार असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

यावल,चोपडा आणि रावेर हे तिन्ही तालुके सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असून सिमा रेषेवर गुजरात आणि मध्यप्रदेश अशी दोन राज्य तालुक्यास लागून असल्याने या दोन्ही राज्यातुन मोठया प्रमाणावर न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या विमल गुटखा या पानमसालाची खाजगी वाहन व प्रसंगी एसटी व्दारे चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात वाहतुक करून यावल तालुक्यातील काही गुटखा माफिया कडून करण्यात येते, नंतर एका गोदामात या गुटख्याची साठवन करून तालुक्यात विविध ठिकाणी विक्रीसाठी या गुटख्याची टप्प्या टप्याने वाटप करण्यात येत आहे . शेजारच्या परप्रांतातुन छुप्या मार्गाने आयात करून येणाऱ्या या हानिकारक पानमसाला गुटख्याची एका महिन्यास सुमारे ५० ते ६०लाखाची विक्री करण्यात येत आहे. या बाबतची माहीती संबधीत अन्न व प्रशासन विभागाला नसावी का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत असुन जिल्ह्यात अनेक ठिकाणी लाखो रुपयांचा गुटखा पकडला जात आहे. मात्र यावल तालुक्यात प्रशासनाकडुन या विषयाकडे अर्थपुर्ण डोळेझाक करण्यात येत असल्याने कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे .

Protected Content