गुटखा विक्री करणारे पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ प्रतिनिधी । शहरात गुटखा विक्री करणार्‍या तिघांना बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या पथकाने जेेरबंद केले आहे.

याबाबत वृत्त असे की, भुसावळातील खडका चौफुलीवर केलेल्या कारवाईत २३ रोजी संशयित यासीन उर्फ अज्जू अन्वर शेख (रा. आवेश पार्क, भुसावळ) याला अटक करून, ५३ हजारांचा गुटखा पकडला होता. त्याने गुटख्याचा साठा जळगावातून आणल्याची कबुली दिली होती.

दरम्यान, हा गुटखा त्याने नेमका कुठून आणला याबाबत चौकशी केली. त्याने सिंधी कॉलनी भागातील जे.बी.ट्रेडर्स नावाचे दुकान पोलिसांना दाखवले. यानुसार पोलिसांच्या पथकाने गिरीश राजेलदास खानचंदानी (वय ३५रा.डी-मार्ट जवळ, जळगाव), जयेंद्र मनोहरलाल स्वामी (वय २६, रा.आदर्शनगर, जळगाव) व शेख शकील शेख मासूम (वय ४१, रा.खंडेरावनगर जळगाव) यांना ताब्यात घेऊन ७२ हजार १८७ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई एएसआय कृष्णा भोये, एएसआय गणेश धुमाळ, एएसआय अनिल मोरे, मंगेश गोटला, पोलिस कर्मचारी विकास सातदिवे, रवींद्र तायडे, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, ईश्‍वर भालेराव, सुभाष साबळे, प्रशांत सोनार, अय्याज सैय्यद यांच्या पथकाने केली.

Protected Content