दुचाकीचा कट लागल्यावरून महिलेवर चॉपरहल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । रस्त्याने जात असतांना दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन मद्यपी दुचाकीस्वारांनी महिलेवर चॉपरने हल्ला केल्याचा धक्कादायक घटना जिल्हा रूग्णालयाजवळ रविवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. यात महिला जखमी झाल्या असून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बालाजी पेठ परिसरात आशाबाई प्रभाकर पाटील या वास्तव्यास आहेत. रविवारी २५ फेब्रुवारी रोजी त्या मुलगा गणेश सोबत एरंडोल येथे गेल्या होत्या. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मायलेक हे दुचाकीने घरी जात असतांना जिल्हा रुग्णालया शेजारील गल्लीत (एमएच १९, सीई ९६६९) क्रमांकाच्या दुचाकीस्वार मद्यपी दोन तरुणांनी कट मारला. दरम्यान, आशाबाई पाटील यांच्यासह त्यांच्या मुलाने त्या दुचाकीस्वारांना जाब विचारला असता, याचा राग आल्याने महिलेसह त्यांच्या मुलाला शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावुन गेले. आशाबाई यांनी त्याला प्रतिकार केला असता, दुचाकीस्वार मद्यपी तरुणाने त्याच्या कंबरेला खोचलेला चॉपर काढून महिलेवर वार केले. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर आशाबाई पाटील या तक्रार देण्यासाठी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी दोन जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेवर चॉपरने वार झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. या घटनेचा संपुर्ण व्हीडीओ गणेश पाटील याने काढला असून तो पोलिसांकडे देण्यात आला आहे. पोलीसांनी कसून चौकशीला सुरूवात केली आहे.

Protected Content