अयोध्यानगरात कोरोना लसीकरण शिबीराला नागरीकांचा प्रतिसाद (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अयोध्या नगर परिसरात खान्देश युथ ऑर्गनायझेशन व सामाजिक कार्यकर्त्या सुचित्रा महाजन यांच्या सहकार्याने आज रविवार २६ सप्टेंबर रेाजी कोरोना लसीकरण शिबीरात नागरीकांना लस देण्यात आली. यावेळी परिसरातील नागरीकांना प्रतिसाद दिला.

आयोजित लसीकरण शिबीरात अयोध्यानगर परिसरातील नागरीकांची गर्दी पहायला मिळाली. कोरोना नियमांचे पालन करून प्रत्येकाला कोरोना लस देण्यात आली. यात अयोध्या नगर, कौतिक नगर, सदगरू नगर, म्हाडा कॉलनी, सुप्रीम कॉलनी, एमआयडीसी परिसरातील नागरीकांना लसी लाभ घेतला. आज रविवार असल्यामुळे एमआयडीसीतील मजूरांना सुट्टी असल्याने गर्दी जमली होती.

शिबीर यशस्वितेसाठी श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे दीपक दाभाडे, मी मराठी प्रतिष्ठानचे राहूल परकाळे, पप्पू जगताप, खांन्देश युथ ऑर्गनायझेशनचे रोहन महाजन, शुभम गीते, तेजस दुसाने, श्रेयस चौधरी, रोहित काळे, निखिल परदेशी, मोहित नेमाडे, युगल मंडोरे, संकेत वारुडकर, यश लोढा, वामन महाजन, नितीन काबरा, विजय पाटील, दिपप्रभा पाटील, मनीषा पाटील, सुनीता कबरा, यामिनी पाटील यांचे सहकार्य लाभले.

 

 

Protected Content