केजरीवाल यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड न्युज वृत्तसेवा | आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरी यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली हायकोर्टाच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. ईडी अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण प्रकरणात अटक केल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रिपद काढून घेतले जावे अशी मागणी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.
सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातील याचिका फेटाळली. दिल्ली हायकोर्टानं १० एप्रिल रोजी संदीप कुमार यांनी याचिका दाखल केली असता ती हायकोर्टाने फेटाळून लावली होती. याचिकाकर्त्याला ५० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला होता. कोर्टाने अशाच प्रकारच्या तीन याचिका फेटाळल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने १  जूनपर्यंत अंतरिम जामीन दिला असून त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

Protected Content