दुपारी ३ वाजेपर्यंत जळगावमध्ये ४२.१५% तर रावेरमध्ये ४५.२६% झाले मतदान

जळगाव-लाईव्ह ट्रेंड न्युज प्रतिनिधी | जळगाव जिल्हयातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगावमध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे. दुपारी उन्हाचा कडाका वाढत असल्यामुळेही नागरिकांचा मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत प्रशासनाकडून मतदानाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे.

जळगाव लोकसभा मतदारसंघात 42 .15% मतदान झाले आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघात 45.26% मतदान झाले आहे. यामधील जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव विधानसभा मतदारसंघ – 39.23 %, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ – 45.02 %, अमळनेर विधानसभा मतदारसंघ – 41.16 %, एरंडोल विधानसभा मतदारसंघ – 46.04%, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ – 39.07 %, पाचोरा विधानसभा मतदारसंघ – 43.80 % मतदान झाले आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघ – 46.16%, रावेर विधानसभा मतदारसंघ -48.71 %, भुसावळ विधानसभा मतदारसंघ -43.16%, जामनेर विधानसभा मतदारसंघ – 41.70 %, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ -43.10%, मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 48.67 % मतदान झाले आहे.

Protected Content