शेअर बाजारात तेजी सुरूच

share market

 

मुंबई वृत्तसंस्था । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी कॉर्पोरेट कर कपात जाहीर केला. घोषणा झाल्यानंतर वधारलेला शेअर बाजार आज सकाळी खुला झाला तेव्हाही निर्देशांक ११११.२१ अंकांनी वाढलेला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, सरकारचा चालू आर्थिक वर्षाचा १.४५ लाख कोटी रुपयांचा महसूल त्यामुळे बुडणार आहे. पण या निर्णयामुळे बाजारात थोडी धुगधुगी आली आहे. त्याचा परिणाम आजही दिसून येत आहे. शेअर बाजाराचा निर्देशांक ३९,१२५.८३ तर निफ्टी २६८ अंकांनी वाढून ११,५४२.७० होता. आयटीसी, एल अँड टी, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स आणि एम अँड एमच्या शेअर्सचे दर ५ ते ७ टक्क्यांनी वाढले आहेत. या कॉर्पोरेट टॅक्स कपातीकडे परदेशी गुंतवणूकदार कशाप्रकारे पाहतात, याकडे अभ्यासकांचे लक्ष आहे. सध्याच्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स ३० टक्क्यांहून घटवून २२ टक्के करण्यात आला आहे, तर १ ऑक्टोबर २०१९ नंतर सुरू होणाऱ्या नव्या कंपन्यांसाठी हा दर २५ टक्क्यांवरून घटवून १५ टक्के करण्यात आला आहे.

Protected Content