Home अर्थ देशात पेट्रोलचे सर्वाधिक दर परभणीत; राज्यात पेट्रोल 80 रुपयांच्या पार

देशात पेट्रोलचे सर्वाधिक दर परभणीत; राज्यात पेट्रोल 80 रुपयांच्या पार

0
183

petrol
 

मुंबई (वृत्तसंस्था) मागील सात दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. देशात पेट्रोलचे सर्वाधिक दर परभणीत पाहायला मिळत आहे. परभरणीत पेट्रोलची किंमत प्रति लीटर 81.51 रुपये आहे.

 

देशातील अनेक ठिकाणी पेट्रोलची किंमत प्रति लीटर 80 रुपये, तर डिझेलची किंमत प्रति लीटर 70 रुपये झाली आहे. तर डिझेलचा दर 81.40 रुपये आहे. त्याशिवाय नागपूरमध्ये रविवारी पेट्रोलचे दर 79.79 रुपये होता. तर आज नागपुरात पेट्रोलची किंमत 80.08 रुपये झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये सातत्याने दरवाढ होत असून मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत 27 पैशांनी वाढ झाली असून सध्या पेट्रोलचा दर 79.29 रुपये आहे. तर डिझेलचे 22 पैशांनी वाढल्या असून डिझेलची किंमत प्रति लीटर 70.01 रुपये आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्लीत पेट्रोल प्रति लीटर 73.91 रुपये, कोलकाता मध्ये प्रति लीटर 76.60 रुपये, मुंबईत 79.29 रुपये आणि चेन्नईत 76.83 रुपये झाली आहे.


Protected Content

Play sound