गुरुवारपासून सलग पाच दिवस बँका बंद

AMR 4 1545291954 1545291954

 

मुंबई (वृत्तसंस्था) या महिन्याच्या शेवटी सलग पाच दिवस बँका बंद आहेत. त्यामुळे नवरात्रीच्या खरेदीला अडचणी येणार नये, म्हणून आधीच पैसे काढून ठेवणेच सोयीचे राहणार आहे. 26 आणि 27 सप्टेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर जात आहेत. त्यानंतर 28 सप्टेंबरला महिन्याचा चौथा शनिवार आहे आणि 29 रविवार असल्यामुळे बँक बंद राहतील.

 

पाच दिवस सलग बँका बंद राहणार असल्याने त्याचा परिणाम एटीएमवरही पडू शकतो. एटीएममध्ये पैसे नसल्याने पैशांची कमतरता होऊ शकते. कारण एटीएममध्ये दोन दिवसाचे पैसे ठेवू शकतो. संप आणि बँक बंद असल्यामुळे 5 दिवस एटीएममध्ये पैसे टाकले जाणार नाही. 10 सरकारी बँकांचे विलनीकरण करणार असल्याने कर्मचारी संप पुकारत आहेत. त्यामुळे सलग 26 ते 29 सप्टेंबर पर्यंत बँका बंद राहिल्यानंतर 30 सप्टेंबरला सुरु होतील. पण या दिवशी महिना अखेर असल्यामुळे बँका व्यवहार करणार नाहीत. सलग पाच दिवस बँका बंद राहिल्याने सामान्य जनतेसह व्यापाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

Protected Content