वेडाच्या भरात पतीने केला पत्नीचा खून !

जालना (वृत्तसंस्था) वेडाच्या भरात पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना जालन्यातील अंबड तालुक्यात घडली आहे. मंगलबाई बापासाहेब (३५) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

बाप्पासाहेब उर्फ सचिन टकले आणि त्याची पत्नी मंगलबाई टकले हे दोघे अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील बाजार गल्लीत राहत होते. बाप्पासाहेब टकले हा दोन महिन्यांपासून वेड्यासारखा वागत होता. रविवारी २६ जुलैला दुपारी ४ च्या सुमारास त्याने घराचे दरवाजे बंद केले. त्यानंतर पत्नीची गळा दाबून खून केला. या मृत्यूप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची अंबड पोलिसांनी नोंद केली होती. मात्र त्यानंतर आता आरोपी पती बप्पासाहेब टकले विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content