शार्टसर्कीटने उभा ऊस पेटला; शेतकरी हवालदिल झाला

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विद्यूत तारांच्या घर्षणामुळे शेतातील उभ्या ऊसाला अचानक आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याघटनेमुळे शेतकरी मात्र हवालदिल झालाय.

चोपडा तालुक्यातील गणपुर शिवारातीत घटना आहे. शेतात ऊसाला विद्यूत तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे लागेलल्या आगीत सुमार १६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.  याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, संजय कुमार भालचंद्र पाटील (वय-५६) रा. पंकज नगर, चोपडा यांनी तालुक्यातील गणपुर शिवारात इंदूबाई पाटील व राजेंद्र सोनवणे यांचे शेत केले आहे. शेतात त्यांनी ऊस लावला आहे.  त्याच शेतातून महावितरण कंपनीचे विद्युत तारा देखील गेलेल्या आहे.  २७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांच्या शॉर्टसर्किट होऊन ठिणगी पडल्याने ऊसाला आग लागली. या आगीमध्ये ऊस आणि ठिबक सिंचनच्या नळ्या जळून खाक झाले आहे. या घटनेत १६ लाख ८ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत संजय पाटील यांच्या खबरीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी बाविस्कर करीत आहेत.

 

Protected Content