उष्णतेमुळे दोन झोपड्यांना आग; संसारोपयोगी वस्तू जळून खाक

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उष्णतेमुळे तांडा वस्तीवरील दोन झोपड्यांना झोपडीला आग लागल्याने संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने दोन कुटुंब उघड्यावर आले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण तांडा क्रमांक ४ येथे झोपड्यांची वस्ती आहे. याठिकाणी विजय शेनफडू मोरे (वय-४२) हे आपल्या कुटुंबियांसह वस्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार २८ एप्रिल रोजी तांडा येथील सर्व मजूर शेतावर कामाला गेले होते. दरम्यान उष्णतेमुळे उसाच्या पाते टाकलेल्या झोपडीला अचानक आग लागली. काही क्षणातच झोपडीने मोठी आग घेतली. त्यांच्या झोपडीच्या बाजूला सोमनाथ ठाकरे यांची झोपडीला देखील आग लागली. आग लागल्याने समजताच शेजारी राहणाऱ्या नागरीकांनी तातडीने धाव घेवून आगविझविण्याचा प्रयत्न केला परंतू या आगीत झोपडीसह संसारोपयोगी वस्तू जळू खाक झाले असून ८५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत विजय मोरे यांच्या खबरीवरून मेहुणबारे पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अनवर तडवी करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!