अपघातानंतर चालकाला मारहाण तर ट्रकच्या काचा फोडल्या

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव कारने ट्रकला धडक दिल्याची घटना घडल्यानंतर कारचालकाने ट्रकचालकाला मारहाण करून दुखापत केली आणि त्यानंतर उभ्या ट्रकच्या काचा देखील फोडल्या.

 

जळगाव शहरातील  इच्छादेवी चौक ते कालिंका माता चौकादरम्यान कारने मालट्रकला धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत कारचालकाने ट्रकचालकाला मारहाण करुन जखमी केले होते.  याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हिंगणेखुर्द येथी चालक प्रविणलाल चंदू बाविस्कर हे त्यांच्या ताब्यातील एम.एच.३० बीडी ३५०५ हा घेवून जळगावमार्गे  मनमाडकडे जात होते. यादरम्यान २७ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास जळगावात इच्छादेवी चौक ते कालिंका माता चौकादरम्यान ट्रकला एम.एच.१५ एफ एन ००९८ या क्रमाकांच्या कारने धडक दिली. या धडकेत ट्रकचे बॅनेट तुटून नुकसान झाले. यानंतर कारचालकाने ट्रकचालकाला ओढून मारहाण केली तसेच दगडाने ट्रकच्या काचा फोडून नुकसान केले. अशी तक्रार ट्रकचालक प्रविणलाल बाविस्कर यांनी एमआयडीसी पोलिसात दिली असून त्यावरुन कारचालकाविरोधात गुरुवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण हे करीत आहेत.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content