वाळूच्या डंपरची ॲपेरिक्षाला धडक; रिक्षाचालक गंभीर जखमी

यावल प्रतिनिधी । यावल-चोपडा मार्गावर असलेल्या साईकृपा ढाब्याजवळ वाळूने भरलेल्या डंपने ॲपेरिक्षाचालकाला जोरदार धडक दिली. यात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून डंपरचालक डंपर सोडून फरार झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, यावल शहरापासुन अवघ्या दोन किलोमिटर लांब चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्रोल पंपाच्या पुढे साईकृपा ढाब्या ढाब्याच्या काही अंतरावर रविवार ६ जुन रोजी रात्री ११.२० वाजेच्या सुमारास चोपड्याकडुन भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी डंपरने वाहनाने यावलहून किनगावकडे जाणाऱ्या अॅपेरिक्शा क्रमांक (एमएच १९ एई ६४९३) याला जोरदार धडक दिली. या अपघातात ॲपेरिक्षा चालक गंभीर जखमी झाला.

यावल पोलीस स्टेशनचे पो.नि. सुधीर पाटील यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलीस पाठविले. जेसीबी यंत्रणेच्या सहाय्याने अपघातास कारणीभुत डंपरला बाहेर काढले. याबाबत घटनेतील अपघातास कारणीभुत डंपर वाहनचालक हा डंपर सोडून फरार झाला आहे. रिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून पुढील उपचारासाठी जळगावात हलविण्यात आले आले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.