Home क्राईम बसस्थानकातून मोबाईल चोरणारी टोळी उघड; अल्पवयीन ताब्यात, ५ मोबाईल जप्त

बसस्थानकातून मोबाईल चोरणारी टोळी उघड; अल्पवयीन ताब्यात, ५ मोबाईल जप्त

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा जिल्हापेठ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून एकूण ५ मोबाईल फोन, ज्यांची किंमत सुमारे १ लाख ७१ हजार रुपये आहे, जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये १.३२ लाख रुपयांचा आयफोनही समाविष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संकेत सुरेश नारखेडे हे २९ मे २०२६ रोजी कामानिमित्त जळगाव नवीन बसस्थानक परिसरात आले होते. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पॅन्टच्या खिशातून १,३२,५०० रुपये किमतीचा iPhone 17 Pro अत्यंत चतुराईने लंपास केला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी करण्यात आली तसेच गुप्त बातमीदारांच्या माहितीचा आधार घेण्यात आला.

तांत्रिक तपास आणि मिळालेल्या ठोस माहितीच्या आधारे पोलिसांनी तांबापुरा परिसरातून एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने बसस्थानक परिसरात मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून फिर्यादीचा iPhone 17 Pro तसेच विविध कंपन्यांचे आणखी ४ मोबाईल असा एकूण ५ मोबाईलचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक अनिल वाघ आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई पार पाडली असून त्यांच्या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

संक्षेप: जळगाव बसस्थानक परिसरातील मोबाईल चोरी प्रकरणाचा जिल्हापेठ पोलिसांनी उलगडा करून एका वि


Protected Content

Play sound