भडगाव तालुक्यातील महावितरणच्या सर्व कार्यालयांना सेनेचे ‘ताला ठोको’ आंदोलन

भडगाव, प्रतिनिधी ।  पेरणी कालावधीत शेतकऱ्यांकडील कृषी विजपंपाच्या विजबिल सक्तीने वसुली व मनमानी कारभार विरोधात व बळीराजाच्या न्याय हक्कासाठी महावितरणच्या भडगाव तालुक्यातील सर्व कार्यालयात शिवसेनेच्यावतीने ‘ताला ठोक’ आंदोलन करण्यात आले.

 

आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दिलेल्या इशार्‍यानुसार तालुक्यातील कोळगाव, वडजी, कजगाव, लोणपिराचे, नवे वडधे, भडगाव येथिल महावितरणचे सब स्टेशनला तर शहरातील चाळीसगाव रोड लगतचे मुख्य कार्यालयास ताला ठोक आंदोलन  करण्यात आले. तसेच  नवे वडधे येथील विज वितरण कंपनीच्या सबस्टेशन  येथे  ताला ठोकन आंदोलन करण्यात आले.  भडगाव येथिल सबस्टेशन व मुख्य कार्यालयास उपजिल्हा प्रमुख गणेश परदेशी, प्रथम नगराध्यक्ष शशिकांत येवले, माजी नगरसेवक डॉ. प्रमोद पाटील यांनी ताला ठोकला. यावेळी जगु भोई, इम्रानअली सैय्यद, संतोष महाजन, रवी सोनवणे, अजय चौधरी उपस्थित होते. तर नवे वडधे येथे युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस लखीचंद पाटील यांनी सब स्टेशनला कुलुप ठोकले. यावेळी शिवसेनेचे दिलीप पाटील, विनोद पाटील, नरेंद्र सुर्यवंशी, रवि पाटील, हर्षल पाटील, किशोर राजपुत व शेतकरी बांधव झुबलसिग पाटील, शिवसिग पाटील, नानाभाऊ पाटील, दिपक पाटील, गोकुळ पाटील, राजेन्द्र पाटील, भिकन पाटील, माधव पाटील, ईश्वर पाटील, योगेद्रसिग पाटील, पिन्टु पाटील, भगतसिंग पाटील, छोटु पाटील, अमोल पाटील,  भैय्या पाटील आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.

Protected Content