इंधनदरवाढी विरोधात आंदोलन करणारे काँग्रेस कार्यकर्ते स्थानबद्ध

बुलडाणा, प्रतिनिधी । केंद्र सरकारच्या काळात पेट्रोल – डिझेल दरवाढी विरोधात काँग्रेसच्यावतीने आज शहरातील पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मिळून आंदोलन करण्यात आले. तसेच शहर पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले आहे.

तसेच मोदी सरकारच्या काळात इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने राज्यभर आंदोलन पुकारले असून आज बुलढाण्यात पेट्रोल पंपावर शहराध्यक्ष दत्ता काकस व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मोदी सरकारचा कडाडून निषेध करीत इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान आंदोलकांना शहर पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे.

Protected Content