पातोंडा येथे एकाची गळफास घेवून आत्महत्या

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडा येथील ३० वर्षीय तरूणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली. याबाबत शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील पातोंडा येथील दिनेश सुरेश पाटील (वय- ३० रा. पातोंडा ता. चाळीसगाव) यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवार, ७ रोजी उघडकीस आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून शहर पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पो.हे.कॉ. संदीप तहसीलदार हे करीत आहेत.

 

Protected Content