कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला गुंगारा; ट्रॅक्टर घेवून चालक पसार


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील मानपुर शिवारातून अवैधपणे गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत असताना चालकासह त्याच्या पुतण्याने ट्रॅक्टर घेऊन पसार झाल्याची घटना सोमवारी 23 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता घडली आहे. या संदर्भात दुपारी ३ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील मानपुर शिवारातून ट्रॅक्टर मधून अवैधपणे गौण खनिजाची वाहतूक होत असल्याची माहिती टाहकळी येथील ग्राम महसूल अधिकारी मनीषा बरडीया यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह सोमवारी २३ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता कारवाई केली. यावेळी ट्रॅक्टर चालक ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाघ आणि त्याचा पुतण्या दोन्ही रा. हातनूर ता.भुसावळ यांना ट्रॅक्टर घेऊन भुसावळ तहसील कार्यालय आणण्यासाठी सांगितले. त्यावेळी दोघांनी गौण खनिज रस्त्यावर उभरून ट्रॅक्टर घेऊन पसार झाले. दरम्यान या संदर्भात ग्राम महसूल अधिकारी मनीषा बरडीया यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ट्रॅक्टर चालक ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाघ आणि त्याचा पुतण्या दोन्ही रा. हातनूर ता.भुसावळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जैन करीत आहे.