चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील विचखेडा येथे शेतातील बांधावरून झालेल्या वादातून एका तरूणाला शिवीगाळ करत मारहाण करून डोक्यात दगड टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी २१ जून रोजी सकाळी ८ वाजता चोपडा शिवारात घडली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, समाधान नानु धनगर धनगर वय ३३ रा. विचखेडा हा तरूण चोपडा शिवारातील त्यांच्या शेतात बैलजोडीने औत फिरवत असतांना शेताच्या बांधावरून संशयित आरोपी मुकेश उत्तम बोरसे, सुशिल उत्तम बोरसे आणि नरेंद्र माणिक बोरसे सर्व रा. विचखेडा यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच मुकेश बोरसे याने हातात दगड घेवून समाधानच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली आहे. त्याला चोपडा येथील उपजिल्हा रूग्णालयात उपाचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी समाधान धनगर याने दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मुकेश उत्तम बोरसे, सुशिल उत्तम बोरसे आणि नरेंद्र माणिक बोरसे सर्व रा. विचखेडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील हे करीत आहे.