जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गहाण ठेवलेले शेत सोडण्यासाठी माहेराहून ७ लाख रुपये आणावे या मागणीसाठी शिरसोली येथील माहेरवासणीला सासरी नंदीचे खेडगाव येथे मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात सोमवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील माहीर असलेल्या छाया निलेश राजपूत वय-३० यांचा विवाह पाचोरा तालुक्यातील नंदीचे खेडगाव येथील निलेश युवराज राजपूत यांच्याशी रीतीरीवाजानूसार झालेला आहे. दरम्यान त्यांचे गहाण ठेवलेले शेती सोडवण्यासाठी विवाहितेला माहेराहून ७ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी विवाहितेला शिवीगाळी व माहरण करून शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी शिरसोली येथे निघून आल्या. त्यानंतर त्यांनी सोमवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती निलेश शिवराज राजपूत, सासू शालिनी युवराज राजपूत दोन्ही रा. नंदीचे खेडगाव ता.पाचोरा नणंद जयश्री निखिल पाटील, नंदोई भाऊ निखिल पाटील दोन्ही राहणार जळगाव आणि नणंद वैशाली दीपक पाटील राहणार नाशिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ प्रमोद लाडवंजारी करीत आहे.