Home Uncategorized दुचाकी अपघातात दाम्पत्य जखमी; अज्ञात दुचाकीस्वार फरार

दुचाकी अपघातात दाम्पत्य जखमी; अज्ञात दुचाकीस्वार फरार

0
189

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ राँग साईडने येऊन भरधाव येणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाल्याची घटना रविवारी २२ जून रोजी दुपारी 3 वाजता घडली आहे. या संदर्भात सोमवारी २३ जून रोजी दुपारी ४.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

युवराज पांडुरंग खडसे वय-५२, रा. संभाजीनगर जळगाव हे आपल्या पत्नी मनिषा खडसे यांच्या सोबत दुचाकीने जळगावला येत असताना कुसुंबा गावाजवळ राँग साईने येणारा एका अज्ञात दुचाकीने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात युवराज खडसे व त्यांची पत्नी मनीषा खडसे हे दोघेजण जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचे देखील नुकसान झाले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर अज्ञात दुचाकीस्वार हा दुचाकी घेऊन पसार झाला होता. या संदर्भात सोमवारी २३ जून रोजी दुपारी ४.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कपूर तडवी करीत आहे.

 


Protected Content

Play sound