जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात राहणारा ३० वर्षीय तरूण ही घरात कुणाला काहीही न सांगता १० जून रोजी सकाळी १०.३० वाजेपासून बेपत्ता झाला आहे. याबाबत सोमवारी २३ जून रोजी दुपारी साडेतीन वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. किरण यादवराव बऱ्हाटे वय ३० रा. रविंद्र नगर, मोहाडी रोड, जळगाव असे बेपत्ता झालेल्या तरूणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मोहाडी रोड परिसरात किरण बऱ्हाटे हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवारी २३ जून रोजी दुपारी साडेतीन वाजता त्याने घरात कुणाला काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेला. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्याच्या पालकाने रामानंद नगर पोलीसात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल पाटील हे करीत आहे.