बंद घरातून महिला पोलिसाची पर्स लांबवली ; मोबाईल व दहा हजाराची रोकड लंपास

जळगाव प्रतिनिधी| पिंप्राळ्यात राहणाऱ्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या बंद घराच्या खिडकीतून काठीला हुक लावून पर्स बाहेर काढून मोबाईल व १० हजाराची रोकड लांबविल्याचा प्रकार आज पहाटे उघडकीस आला आहे. याबाबत रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

याबाबत माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागात कार्यरत असलेल्या महिला पोलिस कॉन्स्टेबल वैशाली तुकाराम महाजन (वय 52, रा. एकमुखी दत्त मंदिराजवळ, पिंप्राळा) यांच्या मुलीची तब्येत खराब असल्याने त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले आहे. मुलीला जेवणाचा डबा घेऊन रात्रभर सोबत थांबल्या. त्यावेळी त्यांनी घरातच असलेल्या कॉटवर पर्स ठेवली होती. पर्समध्ये त्यांनी 10 हजार रुपये रोख आणि विवो कंपनीचा मोबाइल ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी एका लांब काठीला तारेने हूक लावून हुकच्या साहाय्याने पर्स खिडकीतून बाहेर काढली. पर्समध्ये 10 हजार रुपये रोख मोबाईल होता. हा प्रकार सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला. त्यावेळी जवळच काठी हूक लावलेल्या स्थितीत व पर्स खाली आढळून आली. रामानंदनगर पोलिसात वैशाली महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मनोज हे बाविस्कर करीत आहे.

Protected Content