आमदार रत्नाकर गुट्टेंची तब्बल २५५ कोटींची संपत्ती जप्त

बीड वृत्तसंस्था । रासप आमदार रत्नाकर गुट्टेंची अंबाजोगाई रोडवरील योगेश्वरी हॅचरिज ही मालमत्ता रात्री उशिरा ईडीने कारवाईत जप्त केलीय. रत्नाकर गुट्टेंची गंगाखेड शुगर्सची २५५ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालीय. त्यांना शेतकरी आणि इतर उद्योगांच्या नावावर कर्ज घेणं भोवलं असून, अंबाजोगाई रोडवरील योगेश्वरी हॅचरिज ही मालमत्ता रात्री उशिरा ईडीने कारवाईत जप्त केलीय. रत्नाकर गुट्टेंची गंगाखेड शुगर्सची 225 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या नावे कर्ज लाटल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज लुटून ती रक्कम आपल्या कंपनीत गुंतवल्याचाही गुट्टेंवर आरोप ठेवण्यात आलाय. रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार असून, ईडीनं ही मोठी कारवाई केली आहे. शेतकऱ्यांच्या नावे परस्पर कर्ज घेऊन गुट्टे यांनी आपल्या विविध कंपन्यात गुंतवणूक केली असून, गंगाखेडमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आमदार रत्नाकर गुट्टे यांना अटकही झाली होती. बीडमधील गुट्टेंच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली.

Protected Content