रेल्वेच्या चोरलेल्या स्लीपार्ट बाजारपेठ पोलीस स्टेशनला पडून ?

c2744fff 8d6b 4930 9f0e f7fd033eae33 1

 

भुसावळ (प्रतिनिधी) येथील बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या आवारात चोरलेले रेल्वेच्या सहा स्लीपार्ट पडून आहेत. परंतू दुसरीकडे ज्या ओमनी गाडीतून हे स्लीपार्ट जप्त करण्यात आले, ती ओमनी आणि चालक मात्र, बेपत्ता आहेत. एवढेच नव्हे तर, या बाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल नसल्याचेही कळते.

बोदवड रेल्वे स्टेशनवरून चोरट्यांनी सहा स्लीपार्ट चोरी करून आणत असल्याची माहिती बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या एका कर्मचाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार भुसावळात येताच कर्मचाऱ्याने सापळा रचून रेल्वेच्या स्लीपार्टने भरलेली काळ्या रंगाची ओमनी गाडीला पकडून सर्व माल बाजारपेठ पोलीस स्टेशनला उतरविला. परंतू याबाबत अद्यापही कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. तर ती काळ्या रंगाची ओमनी गाडी व चालक गायब आहेत. त्यामुळे या प्रकरणात मोठे ‘अर्थ’कारण झाल्याचा संशय संशय व्यक्त केला जात आहे. रेल्वे स्लीपार्टच्या प्रकरणाबाबत बोदवड पोलीस स्टेशनमधून बाजारपेठ पोलीस स्टेशनला फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर सर्व माल बाजारपेठ पोलीस स्टेशनला अजूनही पडून आहे.

 

रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी अनभिज्ञ

रेल्वेच्या स्लीपार्ट चोरी करून काळ्या रंगाच्या ओमनीतून वाहत असतांना बाजारपेठच्या पोलीस कर्मचाऱ्याने त्या वाहनांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. तसेच याबाबत रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी अनभिज्ञ असल्याचे दिसत आहे. रेल्वेचा माल पकडूनही याबाबत रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना माहिती न दिल्यामुळे तो पकडलॆला माल अजूनही पोलीस स्टेशनला पडून आहे.

 

भंगार विकणारा शेठ कोण?

भुसावळातील भंगार विकणाऱ्या शेठचा तो माल असल्याचे सूत्रांनी सांगितले असून या शेठला पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते, असे देखील कळते. ‘अर्थ’कारणामुळे कुठलीही कारवाई केली गेली नसल्याचे बोलले जात आहे.

Add Comment

Protected Content