Home क्राईम फैजपूर शहरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

फैजपूर शहरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
86

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी परिसरातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की, फैजपूर शहरातील शिवकॉलनी परिसरात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. १२ जून रोजी रात्री ११.३० वाजता पिडीत मुलगी आपल्या कुटुंबियांसह जेवण करून झोपले. अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार १३ जून रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घडला. याबाबत प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आली नाही. मुलीच्या भावाने अखेर १५ जून रोजी दुपारी तीन वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound