Home क्राईम घर घेण्यासाठी पैशांची मागणी; विवाहितेचा छळ

घर घेण्यासाठी पैशांची मागणी; विवाहितेचा छळ

0
107


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर घेण्यासाठी माहेरुन तीन लाख रुपये आणावेत या कारणावरून जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात दिव्या ज्ञानेश्वर मोहोटे (वय २३) यांचा पुणे जिल्ह्यातील संगमनेर येथील ज्ञानेश्वर मधुकर मोहोटे यांच्या सोबत विवाह झाला आहे. सद्यस्थितीत दिव्या मोहोटे या आळंदी ला राहतात. दिव्या ने आळंदी चे घर घेण्यासाठी माहेरुन तीन लाख रुपये आणावेत या कारणावरून पती ज्ञानेश्वर मोहोटे व सासु अलका मोहोटे यांनी दिव्या हिस वेळोवेळी शिवीगाळ करत मारहाण केली व शारीरिक व मानसिक छळ केला. यास मामसासरे यांनीही प्रोत्साहन दिले. अशा दिव्या हीने  दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी ज्ञानेश्वर मोहोटे व सासु अलका मोहोटे व मामसासरे अरुण पंढरीनाथ फरगडे तिन्ही रा. संगमनेर जि. पुणे यतीन अनुरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल संजय धनगर हे करीत आहेत.


Protected Content

Play sound