प्रतिक्षा संपली : दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

Waiting is over: X results will be announced tomorrow

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल उद्या शुक्रवारी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहिर करण्यात येणार असल्याची महत्वाची बातमी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटद्वारे कळविले आहे.

 

या परीक्षेस १६ लाख ३८ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ८ लाख  ८९ हजार ५०६ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४९ हजार ४५८ एवढी आहे. हा निकाल शुक्रवारी १७ जून रोजी दुपारी १ वाजता  http://www.mahresult.nic.in या वेबसाईटवर जाहीर होणार आहे.

 

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होतील. ऑनलाईन निकालानंतर गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येतील. अशी देखील देत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेअर करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!