गिरणा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भोकनी शिवारातील गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी चौघांपैकी एका १३ वर्षाचा मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. रविवारी सकाळी त्याच्या मृतदेह आढळून आला असून जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की,  शिवाजीनगरात राहणारे यश पप्पु भालेराव (वय १४), प्रेम परशुराम झांझळ (वय १५), मुयर संतोष सपकाळे (वय १५) व विशाल हिलाल जोहरे (वय १६) असे चौघे शनिवारी १६ जुलै रोजी भोकणी गावाजवळ गिरणा नदीत पोहायला गेले होते. पोहत असताना हे सर्वजण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडत होते. हा प्रकार नदीकाठी असलेल्या काही ग्रामस्तांच्या लक्षात आला. त्यांनी यश, परशुराम व प्रेम यांना पाण्यातून बाहेर काढले. पण विशाल मात्र बाहेर निघु शकला नाही. बरेच प्रयत्न केल्यानंतरही तो गाळात, डोहात अडकला. रात्री उशीरापर्यंत मृतदेह शोधण्यास यश आले नाही.

 

रविवारी १७ जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी पो.कॉ. अनिल फेगडे, पोलीस नाईक दिनेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयत मुलगा हा नुतन मराठा शाळेत इयत्ता दहावीत शिकत होता. त्याच्या पश्चात आई अनिता, वडील हिरालाल सुरेश जोहरे, मोठे भाऊ बबलू आणि सोनू , एक विवाहित बहिण असा परिवार आहे. जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Protected Content