कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटाच्या वाटेवर

कोल्हापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोल्हापुरा जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलीक आणि धैर्यशील माने हे शिंदे गटात दाखल होण्याची शक्यता असून याबाबत आजच्या मेळाव्यात ते घोषणा करण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाने वेगळी चूल मांडल्यानंतर त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे आणि यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी त्यांची उघडपणे साथ दिली. यानंतर पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी देखील दोन दिवसांपूर्वी हाच निर्णय घेतला आहे. यानंतर आज कोल्हापूल जिल्ह्यातील दोन्ही खासदार हाच कित्ता गिरवणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यांनी आज पक्षाच्या मेळाव्याचे आयोजन केले असून यात ही घोषणा होऊ शकते.

ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील, आमदार प्रकाश अबिटकर यांच्या पाठोपाठ नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर हे शिंदे यांच्यासोबत बंडखोरीत सहभागी झाले. त्यानंतर कोल्हापुरातील दोन्ही खासदारांची वाटचाल देखील याच दिशेने असल्याची चर्चा सुरू झाली. मंडलीक यांनी उघडपणे याला नकार दिला. तर धैर्यशील माने हे मातोश्रीवरील बैठकीला देखील उपस्थित होते. या पार्श्‍वभूमिवर, आज दोन्ही खासदार आपली आगामी भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: