माहिती देण्यास टाळाटाळ : अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जनमाहिती व अपिलीय अधिकारी अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोकण विभाग यांच्या विरोधात माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून नौपाळा पोलीस स्टेशन, ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या बद्दल सविस्तर वृत्त असे की, “माहिती अधिकार कार्यकर्ते व प्रवर्तन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाटे यांनी अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे माहिती अधिकारात आदिवासींना न्याय मिळण्याचे अर्ज दाखल केले होते. पण सम्बधित जनमाहिती अधिकारी नि.मा.कोपुलवार व अपील अधिकारी एस.टी.कांबळे यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.

त्यामुळे तक्रारदार मदन शिरसाटे यांनी माहिती अधिकारात कायद्यातील अपिलात माहिती देण्याचे आदेश होवून माहिती न मिळाल्याने भारतीय दंड विधान कलमनुसार जनमाहिती अधिकारी नि मा कोपुलवार व अपील अधिकारी एस टी कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित समितीच्या अध्यक्षांची चौकशी करण्याबाबतचा अर्ज नौपाडा पोलीस स्टेशन ठाणे येथे केलेला आहे. यामुळे अनुसूचित जमाती जात पडताळणी समितीत प्रचंड खळबळ उडालेली असून नौपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी यापुढे नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Protected Content