रिक्षातून तरुणाचा मोबाईल लांबविला

images 1 1

 

जळगाव (प्रतिनिधी) कामावरुन घरी परत जात असताना पद्मालय विश्रामगृहाजवळून रिक्षात बसलेल्या एका तरुणाचा मोबाईल लांबवल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

 

या संदर्भात अधिक असे की, आशाबाबा नगर येथे गटन 83, प्लॉट नं 10 येथे अक्षय आई, वडील यांच्यासह वास्तव्यास आहे. वडील शिवणकाम करतात. तर अक्षय हा नटवर टॉकीस जवळील कापडाच्या दुकानात कामाला आहे. यासाठी तो नेहमी घरुन रिक्षाने ये-जा करतो. शुक्रवारी रात्री 9 वाजता दुकान बंद झाल्यावर अक्षय आशाबाबा नगरकडे जाण्यासाठी निघाला. पद्मालय विश्रामगृहाजवळ एक रिक्षा आली. त्या रिक्षात आधीच तीन जण बसलेले होते. त्यापैकी एक जण उतरुन रिक्षाचालकाच्या शेजारी बसला. अक्षय मागच्या सिटावर मध्यभागी बसला. दोन्ही बाजूने दोन अज्ञात लोकं बसलेले होते. काळी वेळानंतर अक्षय शिवकॉलनी स्टॉपवर उतरला. उतरल्यावर त्याच्या खिशातील 18 हजार रुपये किमतीचा मोबाईल नसल्याचे त्याच्या लक्षात आले.

Protected Content