एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

result

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी,औषधनिर्माणशास्त्र,कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. मध्यरात्रीपासून निकाल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबईची किमया शिकारखाने आणि अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल ९९.९८ टक्के गुणांसह टॉपर ठरले आहेत. मंगळवारी विद्यार्थ्यांना दिवसभर हा निकाल पाहता येणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना हा निकाल mhtcet2019.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

 

ऑनलाइन पद्धतीने जाहीर झालेल्या निकालावर विद्यार्थ्याचे नाव, त्याच्या पालकाचे नाव, आईचे नाव यांचा उल्लेख असेल. निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाउनलोड करून घेतला, याबाबतची माहितीही दिली जाईल, असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने राज्यभरातील 36 जिल्ह्याच्या ठिकाणी 166 परीक्षा केंद्रावर ऑनलाईन पद्धतीने 10 दिवस 19 सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 92 हजार 354 विद्यार्थी बसले होते. तर 20 हजार 930 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले होते. पीएसएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) हे विषय घेवून 2 लाख 76 हजार 166 विद्यार्थी बसले होते. तर पीसीबी(फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) हे विषय घेवून 28 हजार 154 विद्यार्थी बसले होते.

Add Comment

Protected Content