पाण्याखालून धावणाऱ्या पहिल्या मेट्रो रेल्वेचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

कोलकाता-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशातील पाण्याखालून धावणारी देशातील पहिली मेट्रो आज कोलकाता शहरातून धावणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे देशातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो विभागाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सर्वसामान्यांना पाण्याखालील मेट्रोचा आनंद घेता येणार आहे.या मेट्रोचे वैशिष्ट म्हणजे यात 10.8 किमी भाग भूमिगत आहे.

पाण्याखालील मेट्रो बोगदा हा हुगळी नदीच्या खाली 16.6 किलोमीटर पसरलेला अभियांत्रिकीचा मोठा प्रकल्प आहे. अंडरवॉटर मेट्रो हुगळीच्या पश्चिम किनाऱ्यावरील हावडा आणि पूर्व किनाऱ्यावरील सॉल्ट लेक शहराला जोडेल. यात 6 स्थानके असतील, त्यापैकी तीन भूमिगत आहेत. हा भारतातील अशा प्रकारचा पहिला वाहतूक प्रकल्प आहे, ज्यामध्ये मेट्रो रेल्वे नदीखाली बांधलेल्या बोगद्यामधून जाणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील या मेट्रो रेल्वे सेवांचा आढावा घेतला घेत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली होती.

Protected Content