अजिंठा विश्रामगृह येथे बहुजन मुक्ती पार्टी जळगाव जिल्हास्तरीय बैठक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील अजिंठा विश्रामगृह येथे बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष  श्रीकांत होवाळ आणि राज्य सहसचिव हारून मंसुरी यांच्या उपस्थिती नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. 

या बैठकीत युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पराग कोचुरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यात जिल्हा युवा सरचिटणीसपदी पवन नेमाडे, जिल्हा संघटकपदी युसूफ शेख, संपर्क प्रमुख इंद्रिस शेख, आयटी शहराध्यक्षपदी नितांत नेवे, सदस्यपदी रोहिती पाटील, निखील पाटील, अक्षय पाटील, हर्षल पाटील, शेख खान, गौरव राजपूत, रूपेश साळुंखे यांनी निवड करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात.

या कार्यक्रमाला बहुजन मुक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष अमजद रंगरेज, जिल्हा महासचिव विजय सुरवाडे, जिल्हा संयोजक राजेंद्र खरे, राज्य समिक्षा प्रभारी सुमित्र अहिरे, रविंद्र वाडे, जिल्हा कार्याध्यक्ष अलीम शेख, शहर संयोजक सुनील देहडे, महानगराध्यक्ष इरफान शेख, शहर सचिव खुशाल सोनवणे, डॉ. राहूल तायडे, भास्कर जोहरे, शहर संघटक सुभाष सुरवाडे, रियाज पटेल नितीन सोनवणे, गौतम सुरवाडे, देवानंद निकम,राहुल सोनवणे, सुकलाल पेंढारकर, निखिल पाटील शेख मुजजमिल तसेच जळगाव जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल सोनवणे तसेच प्रास्ताविक जिल्हासचिव विजय सुरवाडे यांनी केले.

 

Protected Content