आदित्य लॉन गेटसमोरून फोटोग्राफरची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील आदित्य लॉनच्या गेट समोरून एका फोटाग्राफरची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अविनाश मधुकर साळी वय ५५ रा. पुरूषोत्तम नगर, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. फोटोग्राफी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २८ फेब्रुवारी रोजी रात्री ते भुसावळ शहरातील आदीत्य लॉन येथे कार्यक्रमासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीएक्स १५९५) ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी ही पार्कींगला लावलेली होती. दरम्यान चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेल्याचे रात्री ११ वाजता उघडकीला आले. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर मंगळवारी १९ मार्च रोजी रात्री १० वाजता त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ यासीन पिंजारी हे करीत आहे.

Protected Content