पुणे, वृत्तसंस्था । राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर रिक्षाचालकाना १५०० अनुदान जाहीर केले होते. पण दोन महिने उलटूनही त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही. त्यामुळे रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने तातडीने रिक्षाचालकांना अनुदान द्यावे. या मागणीकरिता खा. गिरीश बापट यांनी पुणे आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे.
यावेळी स्वरदा बापट, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे बाबा कांबळे, रिक्षा फेडरेशनचे बापू भावे, वाहतूक सेनेचे एकनाथ ढोले, सावकाश रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी व अन्य रिक्षाचालक उपस्थित होते. रिक्षा चालकांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी 1500 रुपयांची मदतीची घोषणा झाली. मात्र अद्याप ती मदत रिक्षा चालकांना मिळाली नाही. राज्य सरकारने राज्यतील परमीट धारक रिक्षा चालकांना मदतिसाठी जवळपास 180 कोटीचा निधी उपलब्ध करून तो परिवहन विभागाकडे सुपूर्द केला आहे.
मात्र लिंक ओपन न होणे,माहिती अर्धवट आहे असे सांगून परिवहन विभागाकडून रिक्षा चालकांना मदत देण्यास अडसर निर्माण होत आहे.ही दिरंगाई लवकरात लवकर दूर व्हावी व प्रशासनाला जाग यावी या करिता हे आंदोलन करीत असल्याचे बापट यांनी लोकमत शी बोलताना सांगितले.
राज्य सरकारने रिक्षाचालकांना जाहीर केलेली आर्थिक मदत न दिल्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले . यावेळी उपस्थित सर्वांनी रिकाम्या ताटल्या, वाट्या हातात घेऊन सरकारचा निषेध केला.