Home क्राईम बसस्थानक आवारातून वृध्देच्या गळ्यातील सोनपोत लांबविली

बसस्थानक आवारातून वृध्देच्या गळ्यातील सोनपोत लांबविली

0
117

धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव बसस्थानक आवारात एका ७० वर्षीय वृध्दाच्या गळ्यातील ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत तोडून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवार २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुसुमबाई अमृत पाटील वय ७० रा. रोटवद ता.धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी २२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरात कामानिमित्त आलेल्या होत्या. दरम्यान बसस्थाकाच्या आवारात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेली. ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने समोरच असलेल्या धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि करीम सैय्यद हे करीत आहे.


Protected Content

Play sound