घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार, दोघांवर कारवाई

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील जयदीप ऑटो गॅरेजच्या मागील बाजूस शेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या दोन जणांवर मंगळवारी २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर शहरातील जयदीप ऑटो गॅरेजच्या मागील असलेल्या शेडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा गैरवापर करून त्याचा चारचाकी वाहनांमध्ये भरून काळा बाजार होत असल्याची माहिती अमळनेर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता कारवाई केले. यावेळी संशयित आरोपी जयेश संजय साळी, चंदन प्रल्हाद साळी (दोन्ही रा. रामेश्वर नगर अमळनेर) या दोघांवर कारवाई केली. त्यांच्याकडून गॅसचे २० सिलेंडर मिळून आला. दरम्यान गॅस रिपेरिंग करण्यासाठी लागणारे मशीन व साहित्य असा एकूण ३० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान या संदर्भात पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विनोद संदानशिव यांनी दिलेले फिर्यादीवरून जयेश साळी आणि चंदन साळी या दोघांवर अमळनेर पोलीस ठाण्यात दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहे.

Protected Content